FANDRY च्या निमित्ताने .......
जात जाता नाही जात ....... विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित "टीम FANDRY शी बातचीत व चर्चा " हा कार्यक्रम दादर येथील धुरू सभागृह मध्ये दिनाक २० जून ,२०१४ ला संध्याकाळी ५:३० वाजता पार पडला . या कार्यक्रमाला fandry चे दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच नाटककार राजकुमार तांगडे हे प्रमुख वक्ते होते. नागराज मंजुळे यांची मुलाखत घेण्याकरिता प्रसिद्ध पटकथाकार आशिष पाथरे यांची निवड करण्यात आली. आशिष पाथरे यांनी अनेक मराठी कार्यक्रम,चित्रपट तसेच नाटक यांकरिता पटकथालेखन केले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना सदर करताना गरिबी आणि जातियता या ...