Posts

My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018)

Image
    My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018) इसी बात पे फरमाया है… अगर कुछ मिलना हो तो इत्तेफ़ाक़ से मिल जाता है ! आजच्या ओव्हर-द-टॉप सिनेमाच्या युगात अचानक भेटला एक कमालीचा संथ , शांत आणि मनात घर करणारा चित्रपट ‘कुछ भीगे अल्फ़ाज़’ ! 2018 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट मी आधी कधीतरी मोबाईलवर हट्टाने पाहिला होता. तेव्हा समजला होता का नाही , आज आठवतही नाही. पण नुकतेच विकेंडला OTT स्क्रोल करताना पुन्हा समोर आला आणि वाटलं , " तमाशा जसा वेळेनुसार समजतो , तसा कदाचित हाही आता समजेल!" रात्री 2:20 वाजता चित्रपट सुरू केला आणि पहिल्याच क्षणी झैन खान दुर्राणी ने साकारलेल्या अल्फ़ाज़चा आवाज ऐकला आणि मी मोहून गेले. इसी बात पे फरमाया है… ना मंज़िल की खबर , ना रास्ते की फ़िक्र , फिर भी चले जा रहे है … ऐसा है तेरे इश्क़ का असर… या चित्रपटाचा नायक जरी तो असला तरी खरा नायक हा त्याचा आवाज होता. चित्रपटातील नायिका म्हणते , अगदी तसाच त्याच्या त्या ओर्गॅस्मिक , खोल आणि संयमी पण धीर-गंभीर आवाजाने   चित्रपटाची पकड घट्ट धरली. ऐरवी उथळ आणि मोस्ट ऑफ द टाइम ‘प्रॅक्ट...

कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल....

Image
तुझी काळजी मला हवीहवीशी वाटते पण त्यामागे असलेलं तुझं प्रेम नकोय मला कारण आपल्यामध्ये कदाचित सगळ्या भावना असतील पण ते 'प्रेम' नसेल मी तुझ्यासोबत हसेन, तुझ्यासोबत रडेन तुझ्या आनंदात उड्या मारेन, तुझ्या दुःखात तुला मिठीत घेईन पण... हे फक्त मैत्री म्हणून असेल कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल तुझ्यासोबत दिवसभर गप्पा मारेन, तुला जे मला सांगायचे आहे ते सगळं ऐकेन तुला माझ्या सगळ्या अडचणी सांगेन, माझे प्रश्न सोडव म्हणून तुला भंडावून सोडेन पण... याला तू माझी मैत्री समज प्रेम नको कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल तू मला म्हणशील आपण 'परफेक्ट' आहोत ग ! मी पण याला दुजोरा देईन तू मला म्हणशील आपण 'बेस्ट कपल गोल' सेट करू ! मी त्याला नकार देईन पण... तो नकार तुझ्या प्रेमाला असेल आपल्या मैत्रीला नाही कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल तू म्हणशील माझ्यात काय कमी आहे ? तू माझ्या प्रेमाला का नाकारतेयस रडण्याला माझा खांदा आणि हसून टाळी देण्यासाठी माझा हात वापरतेयस मग तोच हात घट्ट पकडू दे कधीही न सोडण्याच्या निश्चयाने, विश्वास ठेव एकदा पूर्ण मनाने ...
Image
संदेसे आते है..... शौर्याम   दक्षम युधे बलिदान परमो धर्मा।।   प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हमखास लागणारं गाणं. कधी कधी माझ्यासारखे लोक सहज म्हणून देखील हे गाण आपल्या प्लेलिस्ट मध्ये ठेवतात आणि ऐकतात देखील. आज 15 ऑगस्ट म्हणून माझं देशप्रेम नेहमीपेक्षा जरा जास्त नक्कीच उफाळून आलं म्हणून सकाळी उठल्यापासून देशाप्रति आपलं प्रेम दाखवायची गाणी घरात लावलेली. सांगायला खरंच लाज वाटते पण शाळा संपल्यानंतर नीटसा असा स्वातंत्र्य दिवस साजरा केलाच नाही पण हा देशप्रेम माझ्यात नक्कीच बऱ्यापैकी आहे असं मला वाटंत. असो, विषय भरकटतोय, हा तर संदेसे आते है, हे गाणं ऐकलं की नकळतपणे प्रत्येकाचं देशप्रेम, सैनिकांप्रति आपुलकी त्यांचा हेवा, कौतुक, मान, सन्मान आणि ऊर भरून येण्याची भावना अशा सगळ्याच भावना एकत्र दाटून येतात. मला आठवतंय ज्यावेळी मुंबईमध्ये डॉक्टरांना मारहाण झाली होती आणि ते संपावर गेले होते त्यावेळी सैनिकांसोबत त्यांची तुलना केली जात होती की सैनिक आपलं काम सोडून कधी संपावर गेले तर किंवा ते कधी काहीच मागणी करत नाही अँड ऑल असं बरंच काही. त्यावेळी एक कमेंट मी वाचली होती की...

मैत्रीचा ठेका नक्की कुणाचा ?

आपल्या बॉलीवूडने मुलांना चांगल काय शिकवलं नसलं तरी एक गोष्ट मात्र नक्कीच शिकवली आहे आणि ते म्हणजे मैत्री. 'दोस्ताना', 'दिल चाहता है', 'शोले' अगदी अलीकडचे 'संजू', 'थ्री इडियट' आणि अजून बरेचं काही... या सर्व चित्रपटामध्ये लक्षात राहतो तो कार्तिक आर्यनचा 'सोनू के टीटू कि स्वीटी'. म्हणजे मित्राला एखादी मुलगी किती वाईट आहे हे जीव तोडून सांगितलं तरी तो ऐकत नाही पण ज्यावेळी 'तुला मुलगी पाहिजे कि मी' असा प्रश्न विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता 'मला मित ्र पाहिजे' असं बोलून मैत्रीचा आदर्श निर्माण केला गेला. मुलं सहज म्हणतात कि भावा 'प्रेमापेक्षा मैत्रीवर आहे', 'लडकी बाद में पहले अपनी दोस्ती', 'तू अभी इतनी अमीर नहीं हुई कि हमारी दोस्ती खरीद सके' etc. etc...... हे सगळं ठीक आहे, सगळं चांगल देखील आहे पण सध्या मैत्री निभावण्याचा आणि जपण्याचा ठेका फक्त मुलांनीच घेतला आहे. प्रेमाच्या नात्यात प्रेयसीला किती स्थान द्यायचं आणि मित्रांना किती स्थान द्यायचं हे फक्त आणि फक्त प्रियकर ठरवतो अर्थात दोघांच्या वतीन...

मासिक पाळीतील अस्तित्व

Image
स्त्रियांची मासिक पाळी हि अलीकडे चर्चेची बाब बनली आहे. पुरुषप्रधान संस्कृती हि मासिक पाळीमध्ये स्त्रियांचे अस्तित्व घरातून, विधीतून आणि इतर सामाजिक कार्यक्रमातून वगळत आहेत असेच चित्र हल्ली निर्माण केले जात आहे. असे असेल देखील परंतु मासिक पाळी आल्यावर पुरुष जितकी बंधने स्त्रियांवर टाकत नाहीत त्याहून अधिक बंधने स्त्रियाच स्वतःवर टाकून घेतात. 'पॅडमॅन' पाहिल्यावर मासिक पाळीविषयी उघडपणे बोलणाऱ्या स्त्रिया, जे पुरुष मासिक पाळीतील स्त्रीला मज्जाव करतात त्यांना तुम्ही ५ दिवस रक्त स्त्राव झाला तर जिवंत राहाल का? किंवा सहन कराल का? असा प्रश्न खडसावून विचारत असतात त्याच स्त्रिया स्वताहून मासिक पाळी आली की शिवाशिव करणे, देवळात जाणे, प्रसादास स्पर्श करणे, घरात बसणे, जेवण करणे या गोष्टी टाळतात. बर ज्या स्त्रिया स्वतःहून या परंपरा मोडीत काढू पाहतात त्यांना देखील याच स्त्रिया अडवतात. बाहेरची आहेस ना मग मंदिरात नको जाऊ, अंथरुणालाहाथ नको लावू, तू बनविलेले जेवण नको, पाण्याला स्पर्श करू नको . हि सगळी बंधने पुरुष स्त्रियांवर टाकताना मला तरी अजून आढळला नाही हा पण बायका मात्र पावलोपावली भेटल्य...

बघ माझी आठवण येते का ?

Image
मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक , बघ माझी आठवण येते का ? वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो , नाहीच जाणवल काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे, चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल, तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण, तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे , तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर, किशोरीच सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तुही तसचं म्हणं, विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का? यानंतर स...

हो गया रेप करके ?

Image
हो गया रेप करके ? हो गया रेप करके ? हा विडियो पाहिल्या नंतर त्याहूनही जास्त तो ऐकल्यानंतर निर्भया पासून असीफा पर्यंत सर्व बलात्कार पिडित नजरेसमोर आल्या. त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि माध्यमांद्वारे त्याचे झालेले विदारक चित्रण एका 'सी' ग्रेड चित्रपटासारखे डोळ्यांपुढे येत होते. राहून राहून सारखं मनात विचार येत होता कि जेव्हा वेदनेने त्या आकांत करत होत्या, आपली वेदनेचा टाहो त्यांच्यासमोर फोडत होत्या त्यावेळी त्या जनावरांना जरासुद्धा आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत याची जाणीव झाली नसेल का? क्ष णभरासाठी का होईना पण त्यांचे मन विचलित झाले नसेल का? इतकं अमानुष कोण कसं असू शकत ? या झालेल्या घटना काळानुसार माझ्या मनातून विरून जात होत्या ना निर्भया ना असिफा यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी कोणी बोलायला किंवा चर्चा करायला तयार होते. इतक्यात पुन्हा दोन घटना घडल्या ज्यांनी या सगळ्या बलात्काराच्या घटनांना माझ्या समोर पुन्हा उभे केले. १) ८ महिन्याच्या मुलीवर बलात्कार २) गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार किती घृणास्पद या दोन्ही घटना आहेत. ८ महिन्याची मुलगी जी धड बलात्कार बो...