Posts

Showing posts from 2017

देव नाही मानवच

देव नाही मानवच ! धुळ्यामध्ये रुग्णाचा प्राण वाचवण्यात अपयश आल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी  डॉक्टरला मारहाण करण्याची बातमी कानावर आली आणि विचारांचे चक्र सुरु झाले.  हि बातमी शिळी होतंच होती तितक्यात माझ्या घराजवळ असणाऱ्या सायन हॉस्पिटलमध्ये देखील डॉक्टरांना मारहाण  करण्यात आली आहे अशी बातमी टीव्हीवर दाखवण्यात आली. थांबलेल्या विचारांना पुन्हा गती मिळाली.  एकच वाक्य तोंडी आले बिचारे डॉक्टर ! गमावलेला रुग्ण नक्कीच परत नाही येणार याच शोकांतिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दुःख अनावर होऊन भावनेच्या भारत ते हेय सगळं डॉक्टरांमुळे झाले किंवा त्यांनी हलगर्जीपणा केला असा समज करून घेऊन त्यांच्या अब्रूची लख्तरं हि त्यांना मारहाण करून शिवीगाळ करून ते काम करत असलेल्या हॉस्पिटल बाहेर लटकवली जातात. या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारला तरी पुन्हा त्यांनाच दोष देण्यात येतो. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची चिकित्सा होत नसल्याने डॉक्टर आता दानव झाले आहेत असे प्रत्येकजण बोलत सुटलाय. कोर्टाने तर थेट भीती वाटत असेल तर घरी बसा असा काहीसा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. डॉक्टारांवाचून ...