Posts

Showing posts from 2018

मासिक पाळीतील अस्तित्व

Image
स्त्रियांची मासिक पाळी हि अलीकडे चर्चेची बाब बनली आहे. पुरुषप्रधान संस्कृती हि मासिक पाळीमध्ये स्त्रियांचे अस्तित्व घरातून, विधीतून आणि इतर सामाजिक कार्यक्रमातून वगळत आहेत असेच चित्र हल्ली निर्माण केले जात आहे. असे असेल देखील परंतु मासिक पाळी आल्यावर पुरुष जितकी बंधने स्त्रियांवर टाकत नाहीत त्याहून अधिक बंधने स्त्रियाच स्वतःवर टाकून घेतात. 'पॅडमॅन' पाहिल्यावर मासिक पाळीविषयी उघडपणे बोलणाऱ्या स्त्रिया, जे पुरुष मासिक पाळीतील स्त्रीला मज्जाव करतात त्यांना तुम्ही ५ दिवस रक्त स्त्राव झाला तर जिवंत राहाल का? किंवा सहन कराल का? असा प्रश्न खडसावून विचारत असतात त्याच स्त्रिया स्वताहून मासिक पाळी आली की शिवाशिव करणे, देवळात जाणे, प्रसादास स्पर्श करणे, घरात बसणे, जेवण करणे या गोष्टी टाळतात. बर ज्या स्त्रिया स्वतःहून या परंपरा मोडीत काढू पाहतात त्यांना देखील याच स्त्रिया अडवतात. बाहेरची आहेस ना मग मंदिरात नको जाऊ, अंथरुणालाहाथ नको लावू, तू बनविलेले जेवण नको, पाण्याला स्पर्श करू नको . हि सगळी बंधने पुरुष स्त्रियांवर टाकताना मला तरी अजून आढळला नाही हा पण बायका मात्र पावलोपावली भेटल्य...

बघ माझी आठवण येते का ?

Image
मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक , बघ माझी आठवण येते का ? वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो , नाहीच जाणवल काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे, चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल, तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण, तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे , तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर, किशोरीच सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तुही तसचं म्हणं, विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का? यानंतर स...

हो गया रेप करके ?

Image
हो गया रेप करके ? हो गया रेप करके ? हा विडियो पाहिल्या नंतर त्याहूनही जास्त तो ऐकल्यानंतर निर्भया पासून असीफा पर्यंत सर्व बलात्कार पिडित नजरेसमोर आल्या. त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि माध्यमांद्वारे त्याचे झालेले विदारक चित्रण एका 'सी' ग्रेड चित्रपटासारखे डोळ्यांपुढे येत होते. राहून राहून सारखं मनात विचार येत होता कि जेव्हा वेदनेने त्या आकांत करत होत्या, आपली वेदनेचा टाहो त्यांच्यासमोर फोडत होत्या त्यावेळी त्या जनावरांना जरासुद्धा आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत याची जाणीव झाली नसेल का? क्ष णभरासाठी का होईना पण त्यांचे मन विचलित झाले नसेल का? इतकं अमानुष कोण कसं असू शकत ? या झालेल्या घटना काळानुसार माझ्या मनातून विरून जात होत्या ना निर्भया ना असिफा यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी कोणी बोलायला किंवा चर्चा करायला तयार होते. इतक्यात पुन्हा दोन घटना घडल्या ज्यांनी या सगळ्या बलात्काराच्या घटनांना माझ्या समोर पुन्हा उभे केले. १) ८ महिन्याच्या मुलीवर बलात्कार २) गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार किती घृणास्पद या दोन्ही घटना आहेत. ८ महिन्याची मुलगी जी धड बलात्कार बो...

माजी प्रियकर (Ex Boyfriend)

Image
                     .......हो बोलते मी माझ्या माजी प्रियकरासोबत. आवडतो मला त्याचा सहवास, त्याचं अस्तित्व. मला नाही जायचयं त्याच्यापासून लांब किंवा त्याला नाही जाऊ द्यायचंय माझ्या आयुष्यातून. नात्यामधले प्रेम संपले कि तो व्यक्तीदेखील आपल्यासाठी संपतो का? त्याचा इतका राग करायचाच का मुळात? तो मला सोडून गेला, तो आमचं नातं तोडून गेला, त्याने कधी मला समजून घेतलं नाही, त्याने माझा कधी विचार केला नाही. बस्स इतकचं कारण पुरेस आहे का एखाद्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायला? जेव्हा तो माझा मित्र होता तेव्हा पण तर मला माझं आयुष्य सुंदर वाटायचं, तो माझा प्रियकर झाला तेव्हा पण आयुष्य तसच होतं. मित्र असताना माझं आयुष्य त्याच्या भोवती फिरत होतं, प्रियकर झाला तेव्हा पण फिरत होतच ना. काळजी, प्रेम, आदर, आपुलकी इतकचं कशाला आम्ही माणसं पण तशीच होतो. काहीच बदललं नव्हतं आमच्यात. फक्त आमच्या नात्याचे नाव बदललं होत ज्यामुळे नकळत आमच्या एकमेकांकडून अपेक्षा देखील बदलत गेल्या. आता तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि त्याने फक्त माझ्याकडे बघायचं अशी माझी अपेक्षा...

शेवटची भेट

Image
" जिंदगी में खुशिया तेरे आने से है। कुछ तुझे हँसाने  से है तो कुछ तुझे सताने से है... तू रूठ जाए वही चाहत है पर तुझे मनाना  ये तो मेरी ही जरुरत है।" काल झाली शेवटची भेट. शेवटचा चेहरा पाहण्याची एकच अंतिम इच्छा. गेली ती  त्याची इच्छा पूर्ण करायला कारण त्यांच्यात जे होतं ते प्रेम होतं ना.  आधी होती ती खूप रागात इतकं कि तो काय बोलतोय या कडे देखील तिचं लक्ष नव्हतं. ओरडता ओरडता तिची नजर त्याच्या अंगठीवर गेली. अरे... हि तर तीच अंगठी होती जी तिने त्याला पहिल्या ऍनीव्हर्सरीला दिलेली आणि जी त्याने शेवटच्या भांडणात तिच्या समोरच रागाने कचऱ्यात फेकली होती. अचानक तिचा राग निवळला, डोळे पाणावले आणि शब्द मृदू झाले. इतकं प्रेम आहे कि ३ तासानंतर अंधारात जाऊन कचऱ्यातून त्याने ती अंगठी शोधून काढली. ती या विचारानेच रडू लागली. त्याने तिचं रडणं पाहिलं आणि तिला जवळ घेतलं. थोड्या वेळाने विचारलं विसरशील ना मला ? तिने त्याच्याकडे बघितलं आणि रडतच उत्तर दिलं , कशी विसरू तुला सकाळी मोबाईल उघडला तर पहिला तुझा 'गुड मॉर्निंग , लव्ह यू सो मच' चा मॅसेज डोळे शोधतात. आपोआप तुझा डीपी क...

लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप

Image
              लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप          जसजसा काळ बदलत गेला तसतसे नात्यांची , प्रेमाची आणि मैत्रीची परिभाषादेखील बदलत गेली. आपण, आपले , आपल्यासाठी यावरून प्रत्येक नाते हे मी , माझे आणि माझ्यासाठी असे संकुचित होत गेले. मी न माझा राहिलो हे फारच क्वचित ठिकाणी अनुभवायला मिळू लागले. प्रेमामध्ये तर नवनवीन बदल घडतच राहिले. 'लिव्ह इन रिलेशनशिप' , 'समलैंगिक संबंध' , 'करियर ओरिएन्टेड प्रेमसंबंध'  या सर्व बदलांना उधाण आले. या सर्व प्रकारात 'लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप'  हा प्रकार मात्र अजरामर स्वरूपाचा झाला आहे. म्हणजे पूर्वीचा काळी लग्नानंतर नवरा कामानिमित्त मुंबईला आणि बायको गावी असा प्रकार सर्रास होत असे. काहींचे नवरे हे लष्करात कार्यरत असे त्यामुळे देशसेवेसाठी त्यांना सीमेवर आणि बायकांना घरी असा दुरावा तर सहन करावाच लागे. दोन वेग-वेगळ्या गावाचे प्रेमी जोडपे असल्यास एखाद्या लग्नात अथवा कोणत्या ना कोणत्या समारंभांमुळे एकमेकांच्या गावी जाणे होत होते. हि झाली काही पूर्वीच्या काळातील लॉंग डिस्टन्स रिलेशनशि...
Image
अपेक्षाभंग प्रेम , मैत्री किंवा गरजेपुरती असणारी नाती या सर्वांमध्ये ती जेव्हा अडकते तेव्हा ती अपेक्षा बाळगायला सुरुवात करते. प्रेमामध्ये प्रियकराने तिलाच केंद्रबिंदू मानावं तिच्या आवड , निवड , इच्छा आणि अपेक्षा यांची पूर्तता त्यानेच करावी असा तिचा बालहट्ट हो बालहट्टच कारण रिलेशनशिपमध्ये तर मुलगा मुलीचा प्रियकर कमी आणि बापच जास्त असतो. (मुलीने काय करावं आणि काय करू नये हे ठरवण्याचे अधिकार असतात ना त्यांचाकडे) . इतकी बंधने आणि त्यासोबत होणारे लाड याने शेफारलेली मुलगी प्रत्येकवेळी याच भ्रमात राहते कि तिचा प्रियकर तिला पाहिजे असतो तसाच वागेल आणि तसा नाही वागला तर मग अपेक्षाभंगाच दुखः होत. हा अपेक्षाभंग तिने सहन केला तर चांगलाच आहे नाहीतर मग तिच्या या अपेक्षाभंगाच परिवर्तन रागामध्ये   हा राग मग चिडचिड , लहान-सहान गोष्टींवरून भांडण , टोमणे मारणे , सारखं जुन्या गोष्टी उकळून काढणे यामध्ये होत असतो. प्रियकर जर तिचा हा राग , बडबड , चिडचिड सहन करणारा असेल तर ठीक नाहीतर तो हि तसाच असला तर मग त्या रिलेशनशिपचं भविष्य फार काळ असेल असं म्हणता येणार नाही. ब्रेकअप या गोष्टीला मुलीच्या ...