कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल....
तुझी काळजी मला हवीहवीशी वाटते पण त्यामागे असलेलं तुझं प्रेम नकोय मला
कारण आपल्यामध्ये कदाचित सगळ्या भावना असतील पण ते 'प्रेम' नसेलमी तुझ्यासोबत हसेन, तुझ्यासोबत रडेन
तुझ्या आनंदात उड्या मारेन, तुझ्या दुःखात तुला मिठीत घेईन
पण... हे फक्त मैत्री म्हणून असेल कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेलतुझ्यासोबत दिवसभर गप्पा मारेन, तुला जे मला सांगायचे आहे ते सगळं ऐकेन
तुला माझ्या सगळ्या अडचणी सांगेन, माझे प्रश्न सोडव म्हणून तुला भंडावून सोडेन
पण... याला तू माझी मैत्री समज प्रेम नको कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेलतू मला म्हणशील आपण 'परफेक्ट' आहोत ग ! मी पण याला दुजोरा देईन
तू मला म्हणशील आपण 'बेस्ट कपल गोल' सेट करू ! मी त्याला नकार देईन
पण... तो नकार तुझ्या प्रेमाला असेल आपल्या मैत्रीला नाही कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेलतू म्हणशील माझ्यात काय कमी आहे ? तू माझ्या प्रेमाला का नाकारतेयस
रडण्याला माझा खांदा आणि हसून टाळी देण्यासाठी माझा हात वापरतेयस
मग तोच हात घट्ट पकडू दे कधीही न सोडण्याच्या निश्चयाने, विश्वास ठेव एकदा पूर्ण मनाने
ते 'प्रेम' झाले कि मित्र दूर होतो हे अनुभवलेली मी पुन्हा तुला नकार देईन
पण... तो नकार तुझ्यातला मित्र गमावण्याच्या भीतीने असेल तुझ्यावर विश्वास नाही म्हणून नाही
कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल....
- सोनाली बेटकर
Comments
Post a Comment