शेवटची भेट

Image result for miss you images




" जिंदगी में खुशिया तेरे आने से है। कुछ तुझे हँसाने से है तो कुछ तुझे सताने से है... तू रूठ जाए वही चाहत है पर तुझे मनाना ये तो मेरी ही जरुरत है।"

काल झाली शेवटची भेट. शेवटचा चेहरा पाहण्याची एकच अंतिम इच्छा. गेली ती त्याची इच्छा पूर्ण करायला कारण त्यांच्यात जे होतं ते प्रेम होतं ना. आधी होती ती खूप रागात इतकं कि तो काय बोलतोय या कडे देखील तिचं लक्ष नव्हतं. ओरडता ओरडता तिची नजर त्याच्या अंगठीवर गेली. अरे... हि तर तीच अंगठी होती जी तिने त्याला पहिल्या ऍनीव्हर्सरीला दिलेली आणि जी त्याने शेवटच्या भांडणात तिच्या समोरच रागाने कचऱ्यात फेकली होती. अचानक तिचा राग निवळला, डोळे पाणावले आणि शब्द मृदू झाले. इतकं प्रेम आहे कि ३ तासानंतर अंधारात जाऊन कचऱ्यातून त्याने ती अंगठी शोधून काढली. ती या विचारानेच रडू लागली. त्याने तिचं रडणं पाहिलं आणि तिला जवळ घेतलं. थोड्या वेळाने विचारलं विसरशील ना मला ?
तिने त्याच्याकडे बघितलं आणि रडतच उत्तर दिलं ,
कशी विसरू तुला सकाळी मोबाईल उघडला तर पहिला तुझा 'गुड मॉर्निंग , लव्ह यू सो मच' चा मॅसेज डोळे शोधतात. आपोआप तुझा डीपी काय आहे तू स्टेटस काय ठेवलायस हे बघण्याची ओढ लागते. मला जळवण्यासाठी आता कोणता फोटो अपलोड केलायस या विचाराने घाबरायला होतं . घरातून निघाले कि स्टेशनवर उभी राहून तू कुठून तरी मला पाहत असशील म्हणून माझी नजर या आधी तू लपलेल्या सर्व जागांवर भिरभिरते. गाडीत बसल्यावर गाणी सुरु झाल्यावर रडकं गाणं लागलं जसं किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ... किंवा  तुझं आवडतं बोलना माही बोलना सुरु झालं कि मुद्दाम गाणं बदलते. कामात असल्यावर जेवणाची वेळ झाली कि तो जेवला असेल का कि बाहेरच्या समोसा आणि वडापाव वर आहे कि सिगरेट पिऊन भूक भागवतोय याचाच विचार असतो. कामातून सुटल्यावर निघताना अरे... कुठे तरी वाटेत तो उभा असेल. मला
मनवायला आला असेल नाही तर त्याला मला बघायची इच्छा झाली असेल म्हणून आला असेल या विचाराने नुसतं मागे-पुढे पाहत तुला शोधत रस्ता तुडवत असते. दादर आलं कि फोन येईल ईस्ट ला ये बस स्टॉप जवळ खाली उभा आहे मी असा फोन येईल. या विचाराने फोन हातातच ठेवते कारण चुकून फोन आलेला मला समजला नाही तर... परत तेच घरी जाताना तू कुठे तरी माझ्या वाटेत उभा असशील. मी घरी सुखरूप पोहचते कि नाही याची काळजी घ्यायला लपत आणि मला दिसणार नाही अशा पद्धतीने माझा मागून चालत राहशील. मी घरी पोचल्यावर फोन करशील आणि म्हणशील ब्ल्यू टॉप मध्ये चांगली दिसत होती, कपडे जरा व्यवस्थित घालत जा माहित आहे तुमची फॅशन आहे ते पण सगळेच तसा विचार नाही करत, पाय दुखतोय का नाचली असशील पडेपर्यंत .... आणि खूप काही.  किंवा मग कधी तरी आठवण त्रास द्यायला लागल्यावर आणि  दारू जास्त झाल्यावर फोन करशील विचारायला कि तुला काय कमी पडत होत माझ्याकडून? गर्लफ्रेंड सारखं नाही बायको सारखं मानतं होतो तुला मग सांग ना कुठे कमी पडलो मी ? आणि मी एकच उत्तर देईन कि तिथेच तर चुकलास तू आधी नीट बॉयफ्रेंड तरी बनायचं ना आपल्या नात्याला तितकं फुलायला वेळ तरी द्यायचा ना .... नवरा तर काय बनणारच होतास ना माझा. लांबचा विचार करता करता तू जवळ कधी आलासच नाही. आणि बोलता बोलता तू रडशील आणि तू रडतोयस म्हणून मला रडायला येईल. आणि सॉरी उद्यापासून तुला परत कधी त्रास नाही देणार , ना मॅसेज ना कॉल करणार असं बोलून तू फोन ठेवणार आणि परत दुसऱ्या दिवशी मला कॉल करणार. सांग ना कसं विसरू तुला सकाळ सुरु पण तुझ्यापासून होते माझी आणि रात्र
संपते पण तुझ्यावरच. काय विसरू आणि काय नको विसरू सांग ना तूच. 
हे बोलता बोलता अजून एक थेंब तिच्या डोळ्यातून पडला आणि त्या वेदनेने तो असह्य झाला. मिठीत घेत तिला तो म्हणाला खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, तू जीव आहेस माझा ती पण त्याला म्हणाली माहित आहे रे सगळं मला पण आपण दोन टोक आहोत ना तू माझ्यासारखा ना मी तुझासारखी ओढून ताडून कितीही प्रयत्न केला तरी त्रास हा आपल्या नात्यालाच होणार. सो आपण लांब राहून एकमेकांवर तितकंच प्रेम करून आणि एकमेकांना तितकाच जीव लावू. उशीर झाला होता खरा पण निघताना त्याने तिला आणि तिने त्याला या जगात या पुढे कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं हे सांगितलं. शेवटची मिठी मारताना मात्र  नकळत तिच्या
तोंडून लव्ह यु सो मच बाहेर पडलं आणि तो डोळ्यातील अश्रू पुसत निघून गेला.

.... खरचं जिंदगी में खुशियाँ तेरे ही बहाने से है। तेरे साथ रेहने से है और तेरे पास होने के एहसास से है।


Comments

Popular posts from this blog

My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018)

कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल....