My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018)
My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018)
इसी बात पे फरमाया है…
अगर कुछ मिलना
हो तो इत्तेफ़ाक़ से मिल जाता है!
आजच्या
ओव्हर-द-टॉप सिनेमाच्या युगात अचानक भेटला एक कमालीचा संथ, शांत आणि मनात घर
करणारा चित्रपट ‘कुछ भीगे अल्फ़ाज़’ ! 2018 साली प्रदर्शित
झालेला हा चित्रपट मी आधी कधीतरी मोबाईलवर हट्टाने पाहिला होता. तेव्हा समजला
होता का नाही, आज आठवतही नाही. पण नुकतेच
विकेंडला OTT स्क्रोल करताना पुन्हा समोर
आला आणि वाटलं, "तमाशा जसा वेळेनुसार समजतो, तसा कदाचित हाही आता समजेल!"
रात्री 2:20 वाजता चित्रपट सुरू
केला आणि पहिल्याच क्षणी झैन खान दुर्राणी ने साकारलेल्या अल्फ़ाज़चा आवाज ऐकला आणि मी मोहून गेले.
इसी बात पे फरमाया है…
ना मंज़िल की
खबर,
ना रास्ते की
फ़िक्र,
फिर भी चले जा
रहे है…
ऐसा है तेरे
इश्क़ का असर…
या चित्रपटाचा नायक
जरी तो असला तरी खरा नायक हा त्याचा आवाज होता. चित्रपटातील नायिका म्हणते, अगदी तसाच त्याच्या
त्या ओर्गॅस्मिक, खोल आणि संयमी पण धीर-गंभीर आवाजाने चित्रपटाची पकड
घट्ट धरली. ऐरवी उथळ आणि मोस्ट ऑफ द टाइम ‘प्रॅक्टिकल’ असलेली मी त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध
होत, त्याच्या आवजामध्ये जाणवणाऱ्या एकटेपणाचा शोध घेऊ लागली. त्याचा प्रत्येक
उदास शब्द, प्रत्येक हळवी
शायरी ही अल्फ़ाज़साठी दु:ख व्यक्त करण्याचे
आणि आठवणीतून मोकळे होण्याचे माध्यम होते.
इसी बात पे
फरमाया है
अजब सौदेबाज़ी
है रंज-ओ-ग़म की…
सब कुछ छीन कर भी
दिल भारी कर जाता है..
कोणीही पसंत करत नसणाऱ्या मुलीला जेव्हा तिचा जवळचा मित्र पसंत करतो तेव्हा मात्र
ती आपल्या हक्काचा एकुलता एक मित्र गमावला जाईल या भीतीने त्याच्याशी जवळीक साधत नाही.
हा विचार प्रेम आणि मैत्री यामध्ये असणारी पुसट रेषा दर्शवितो.
एका wrong
number call मुळे आरची आणि अल्फ़ाज़ एकमेकांच्या आयुष्यात येतात. परंतु हा तोच अल्फ़ाज़ आहे ज्याचा
आवाज तिच्या मनात घर करून गेला आहे, ज्याची प्रतिकृति ती सर्वत्र शोधत आहे याचा तिला अंदाज
नसतो. अल्फ़ाज़ची शायरी
लाखों लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असं तिला वाटतं म्हणून ती व्हाटसअपच्या माध्यमातून
त्या वायरल करते. पण अल्फ़ाज़साठी या शायरी म्हणजे त्याच्या प्रायव्हेट जखमा
होत्या. त्यांचा उघड्यावर बाजार मांडणे त्याला सुरुवातीला आवडलं नव्हतं.
इसी बात पे फरमाया है
सबने कहा मुझसे तू एक दिन चली जाएगी…
मैंने कहा तुझे
ज़िंदगी बुलाऊँगा…
फिर मौत ही
हमें अलग कर पाएगी…”
परंतु भावनांना शब्दांत बांधून न ठेवता त्यांना अलगदपणे सोडून देणे हे त्याला आरचीने शिकवले. आता प्रेम त्याला शांत करत होतं. तो नकळत तिच्यावर प्रेम करू लागतो. तिला देखील त्याच्यामध्ये अल्फ़ाज़ची प्रतिकृति दिसत असते. परंतु, हे जेव्हा तीच्या लक्षात येते तेव्हा ती थांबते, तिला ती ज्या मुलासोबत बोलत असते, कम्फर्टेबल असते तिला त्याला भेटायचे असते ना की, अल्फ़ाज़विषयी तीच्या मनात असलेल्या प्रतिकृतिला..
एकीकडे अल्फ़ाज़ पण भूतकाळातल्या अपराधी भावनेशी झुंज देत असतो.
तिथे आरची त्याला त्यातून मुक्त होण्याच्या वाटेचा मार्ग दाखवते आणि त्याच्या एकाकी
आणि नकारात्मक सुरात सकारात्मकतेचे बीज पेरण्यास सुरुवात होते.
हा चित्रपट पाहताना आपण फक्त दोन पात्रांची कथा पाहत नाही तर
आपल्या मनाची हळवी, संवेदनशील बाजू पडद्यावर हळूच उलगडताना पाहतोय असंच मला वाटत होते.
NOTE: “इसी बात पे फरमाया है”.. हा या चित्रपटाचा आत्मा आहे. एखाद्या विकेंडला हा चित्रपट नक्की पहा!
#KuchBheegeAlfaaz #PoetryCinema #MyKindOfMovie #MarathiBlogger #QuietLove #OTTFinds
#FilmReviewMarathi #LoveAndLoneliness
Tags: कुछ भीगे अल्फ़ाज़ review in Marathi, कुछ भीगे अल्फ़ाज़ ब्लॉग, Romantic movies review Marathi, Poetry cinema India, Independent romantic films, Bollywood poetry movies, OTT movie recommendations

Comments
Post a Comment