अपेक्षाभंग


प्रेम , मैत्री किंवा गरजेपुरती असणारी नाती या सर्वांमध्ये ती जेव्हा अडकते तेव्हा ती अपेक्षा बाळगायला सुरुवात करते. प्रेमामध्ये प्रियकराने तिलाच केंद्रबिंदू मानावं तिच्या आवड,निवड,इच्छा आणि अपेक्षा यांची पूर्तता त्यानेच करावी असा तिचा बालहट्ट हो बालहट्टच कारण रिलेशनशिपमध्ये तर मुलगा मुलीचा प्रियकर कमी आणि बापच जास्त असतो. (मुलीने काय करावं आणि काय करू नये हे ठरवण्याचे अधिकार असतात ना त्यांचाकडे) . इतकी बंधने आणि त्यासोबत होणारे लाड याने शेफारलेली मुलगी प्रत्येकवेळी याच भ्रमात राहते कि तिचा प्रियकर तिला पाहिजे असतो तसाच वागेल आणि तसा नाही वागला तर मग अपेक्षाभंगाच दुखः होत. हा अपेक्षाभंग तिने सहन केला तर चांगलाच आहे नाहीतर मग तिच्या या अपेक्षाभंगाच परिवर्तन रागामध्ये  हा राग मग चिडचिड, लहान-सहान गोष्टींवरून भांडण , टोमणे मारणे, सारखं जुन्या गोष्टी उकळून काढणे यामध्ये होत असतो. प्रियकर जर तिचा हा राग,बडबड,चिडचिड सहन करणारा असेल तर ठीक नाहीतर तो हि तसाच असला तर मग त्या रिलेशनशिपचं भविष्य फार काळ असेल असं म्हणता येणार नाही.
ब्रेकअप या गोष्टीला मुलीच्या अपेक्षा जितक्या कारणीभूत आहेत तितकच मुलाच्या तिला गृहीत धरण्याच्या सवयी, किंवा नको त्या गोष्टींबद्दल अपेक्षा बाळगण्याच्या तिच्या विचारांना त्याने दिलेलं खतपाणी. टाळी एका हाताने वाजत नाही त्यामुळे दोन्ही हातांची करामत बघणे हे तितकेच गरजेचे. फक्त चुकी तुझी होती - चुकी तुझी होती असं बोलण्यात मग अर्थ राहत नाही कारण चुकी कोणाचीहीअसली तरी गमवावं तर प्रेमासारख सुंदर नातच आहे. त्यामुळे मुलींनी कोणत्या अपेक्षा बाळगाव्या आणि कोणाकडून बाळगाव्या याचा विचार करावा आणि मुलांनी देखील उगीच मुलींना गृहीत न धरता उगाच तुम्ही पूर्ण न करू शकणाऱ्या तिच्या अपेक्षांना खतपाणी घालणं बंद करा.


Comments

Popular posts from this blog

My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018)

शेवटची भेट

कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल....