मासिक पाळीतील अस्तित्व
स्त्रियांची मासिक पाळी हि अलीकडे चर्चेची बाब बनली आहे. पुरुषप्रधान संस्कृती हि मासिक पाळीमध्ये स्त्रियांचे अस्तित्व घरातून, विधीतून आणि इतर सामाजिक कार्यक्रमातून वगळत आहेत असेच चित्र हल्ली निर्माण केले जात आहे. असे असेल देखील परंतु मासिक पाळी आल्यावर पुरुष जितकी बंधने स्त्रियांवर टाकत नाहीत त्याहून अधिक बंधने स्त्रियाच स्वतःवर टाकून घेतात.
'पॅडमॅन' पाहिल्यावर मासिक पाळीविषयी उघडपणे बोलणाऱ्या स्त्रिया, जे पुरुष मासिक पाळीतील स्त्रीला मज्जाव करतात त्यांना तुम्ही ५ दिवस रक्त स्त्राव झाला तर जिवंत राहाल का? किंवा सहन कराल का? असा प्रश्न खडसावून विचारत असतात त्याच स्त्रिया स्वताहून मासिक पाळी आली की शिवाशिव करणे, देवळात जाणे, प्रसादास स्पर्श करणे, घरात बसणे, जेवण करणे या गोष्टी टाळतात. बर ज्या स्त्रिया स्वतःहून या परंपरा मोडीत काढू पाहतात त्यांना देखील याच स्त्रिया अडवतात. बाहेरची आहेस ना मग मंदिरात नको जाऊ, अंथरुणालाहाथ नको लावू, तू बनविलेले जेवण नको, पाण्याला स्पर्श करू नको . हि सगळी बंधने पुरुष स्त्रियांवर टाकताना मला तरी अजून आढळला नाही हा पण बायका मात्र पावलोपावली भेटल्या. जर स्त्रियांना स्वतःलाच मासिक पाळीतील त्यांचे अस्तित्व मान्य नसेल तर त्यांनी पुरुषांकडून त्याचं अस्तित्व स्वीकारण्याचा 'उगाचच स्त्रीहट्ट' का करावा?
Comments
Post a Comment