माजी प्रियकर (Ex Boyfriend)
.......हो बोलते मी माझ्या माजी प्रियकरासोबत. आवडतो मला त्याचा सहवास, त्याचं अस्तित्व. मला नाही जायचयं त्याच्यापासून लांब किंवा त्याला नाही जाऊ द्यायचंय माझ्या आयुष्यातून. नात्यामधले प्रेम संपले कि तो व्यक्तीदेखील आपल्यासाठी संपतो का? त्याचा इतका राग करायचाच का मुळात? तो मला सोडून गेला, तो आमचं नातं तोडून गेला, त्याने कधी मला समजून घेतलं नाही, त्याने माझा कधी विचार केला नाही. बस्स इतकचं कारण पुरेस आहे का एखाद्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायला? जेव्हा तो माझा मित्र होता तेव्हा पण तर मला माझं आयुष्य सुंदर वाटायचं, तो माझा प्रियकर झाला तेव्हा पण आयुष्य तसच होतं. मित्र असताना माझं आयुष्य त्याच्या भोवती फिरत होतं, प्रियकर झाला तेव्हा पण फिरत होतच ना. काळजी, प्रेम, आदर, आपुलकी इतकचं कशाला आम्ही माणसं पण तशीच होतो. काहीच बदललं नव्हतं आमच्यात. फक्त आमच्या नात्याचे नाव बदललं होत ज्यामुळे नकळत आमच्या एकमेकांकडून अपेक्षा देखील बदलत गेल्या. आता तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि त्याने फक्त माझ्याकडे बघायचं अशी माझी अपेक्षा आणि माझ्या गर्लफ्रेंडला माहित आहे कि मी कितीपण मुलींकडे बघितल आणि कमेंट पास केली तरी माझं तिच्यावर प्रेम आहे हा त्याचा विश्वास. खरं तर या प्रेमामुळे आम्ही दोघेही एकमेकांना गृहीत धरू लागलो होतो. तो असाच वागणार आणि ती अशीच वागेल असं वाटत होत. त्यामुळे जरा जरी काही विरुद्ध घडलं तर मग भांडण. असचं भांडण करता करता एक दिवशी फायनली ब्रेकअप. मग काय झुरणं, रडणं, त्रास करून घेणं सुरूच राहील. शेवटी एक दिवशी दोघेही मूव्ह ऑन झालो. एकमेकांशी नॉर्मली बोलू लागलो. आमच्या प्रेमाशिवाय आमच्या मैत्रीबद्दल बोलू लागलो. यातून फक्त एकच गोष्ट जाणवली दोघांनाही कि आपला इतिहास आठवून डोळ्यात पाणी येता कामा नये. आपण एकत्रित खूप चांगले क्षण व्यतीत केले आहेत एकमेकांसोबत ते आठवून हसू. गरजेचे नाही कि प्रत्येक वेळी माजी प्रियकर बोलायला आला कि आपल्याला त्रासच झाला पाहिजे किंवा आपण त्याला हिडीस पीडीसी केलं पाहिजे त्याहूनही अधिक त्याला कधी प्रेम भेटूच नये अशी प्रार्थना करणे हे काहीच गरजेचं नसत. कारण प्रेम करण्याआधी तुम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतात. आणि हि मैत्री कधीच विसरू नका. त्यामुळे मी माझ्या माजी प्रियकरासोबत बोलणार कारण आता तो माझा माजी प्रियकर नसून माझा तोच मित्र आहे ज्याच्या सोबत आणि ज्याच्यासाठी मी या जगातील सर्वात सुंदर आणि खरी मैत्रीण होते.
Comments
Post a Comment